तुमचा 'तो' फोटो मीम्समध्ये वापरला जातोय; नरेंद्र मोदी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 01:16 PM2019-12-26T13:16:56+5:302019-12-26T13:28:02+5:30

नरेंद्र मोदी यांनी  लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकडे आणि देशातील विविध ठिकाणाचे सूर्यग्रहण पाहिले.

Photo while watching the solar eclipse is used in meme; PM Narendra Modi says Most welcome..enjoy | तुमचा 'तो' फोटो मीम्समध्ये वापरला जातोय; नरेंद्र मोदी म्हणतात...

तुमचा 'तो' फोटो मीम्समध्ये वापरला जातोय; नरेंद्र मोदी म्हणतात...

Next

मुंबई:  यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी राज्यासह देशभरात नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीमधील पंतप्रधान निवस्थानाहून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र देशातील उत्तरेकडील राज्यात ढगाळ वातावरणाचं सावट असल्यामुळे त्यांना थेट सूर्यग्रहण पाहता आले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी  लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकडे आणि देशातील विविध ठिकाणाचे सूर्यग्रहण पाहिले. नरेंद्र मोदी या स्वत: या संबंधित ट्विटरच्या माध्यामतून माहिती दिली. तसेच वैज्ञानिकांसोबत सूर्यग्रहण पाहत असल्याचे फोटो देखील त्यांनी ट्विटरवर शेअर केले. नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर एका नेटकऱ्यांनी रिट्विट करत तुमचा फोटो सोशल मीडियावर मीम्समध्ये वापरला जात असल्याचे सांगितले.

 

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला रिट्विट करत नेटकऱ्यांनी सूर्यग्रहण पाहातानाचा फोटो शेअर करुन तुमचा हा फोटो सोशल मीडियावर मीम्समध्ये वापराला जात असल्याचे सांगितले. यावर नरेंद्र मोदी यांनी देखील तुमचे आभार असल्याचे सांगत आनंद घ्या असं मिश्कील उत्तर दिलं.

नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशातील नागरिकांप्रमाणे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. परंतु ढगाळ वातावरणामुळे मला थेट सूर्यग्रहण पाहता आलं नाही. त्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकडे आणि देशातील विविध ठिकाणाचे सूर्यग्रहण वैज्ञानिकांसोबत पाहिले असल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले होते. भारताच्या दाक्षिणात्य भागात सूर्यग्रहण चांगलं दिसतयं मात्र उत्तरेतील राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहण्यास अडथळा निर्माण झाला होता.

चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.

Web Title: Photo while watching the solar eclipse is used in meme; PM Narendra Modi says Most welcome..enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.