काँग्रेसच्या महाविधेशनातील 'त्या' छायाचित्राचे मिम व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 17:41 IST2018-03-18T17:41:47+5:302018-03-18T17:41:47+5:30

photo of rahul gandhi sonia gandhi manmohan singh on congress general assembly going viral | काँग्रेसच्या महाविधेशनातील 'त्या' छायाचित्राचे मिम व्हायरल

काँग्रेसच्या महाविधेशनातील 'त्या' छायाचित्राचे मिम व्हायरल

नवी दिल्ली: राजधानीत सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या महाविधेशनातील छायाचित्रांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. यापैकी एक छायाचित्र सध्या ट्रोलचा विषय ठरत आहे. या छायाचित्रात बहुधा एखाद्या ठरावाच्या अनुमोदनार्थ काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावल्याचे दिसत आहे. मात्र, हे छायाचित्र बारकाईने पाहिल्यास त्यामध्ये पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हात खालीच असल्याचे दिसत आहे. नेमक्या याचवेळी राहुल गांधी आईकडे बघत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. राहुल आणि सोनिया यांच्या या देहबोलीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यावरून आता ट्विटरवर चांगल्या-वाईट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यामधील अनेक प्रतिक्रिया या राहुल गांधींना ट्रोल करणाऱ्या आहेत. त्यामुळे हे छायाचित्र इंटरनेटवर कमालीचे व्हायरल झाले आहे.

























 

Web Title: photo of rahul gandhi sonia gandhi manmohan singh on congress general assembly going viral