Pfizer Corona Vaccine: चौथ्या लसीसाठी केंद्र सरकारची बोलणी सुरु; मात्र कंपनीचा राज्यांना थेट पुरवठ्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:06 PM2021-05-24T18:06:16+5:302021-05-24T18:07:16+5:30

Pfizer Corona Vaccine: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची टंचाई असताना केंद्र सरकार चौथ्य़ा लसीसाठी प्रयत्न करू लागले आहे. ही लस मिळाल्यास देशात रखडलेली लसीकरण मोहिम पुन्हा एकदा वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे.

Pfizer’s discussions with the Government of India for corona Vaccine | Pfizer Corona Vaccine: चौथ्या लसीसाठी केंद्र सरकारची बोलणी सुरु; मात्र कंपनीचा राज्यांना थेट पुरवठ्यास नकार

Pfizer Corona Vaccine: चौथ्या लसीसाठी केंद्र सरकारची बोलणी सुरु; मात्र कंपनीचा राज्यांना थेट पुरवठ्यास नकार

Next

Pfizer Corona Vaccine: कोव्हॅक्सिन (Covaxin), कोव्हिशिल्ड (Covishield) आणि रशियाची जगातील पहिली लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) लस भारतीयांना देण्यास सुरुवात झालेली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची टंचाई असताना केंद्र सरकार चौथ्य़ा लसीसाठी प्रयत्न करू लागले आहे. ही लस मिळाल्यास देशात रखडलेली लसीकरण मोहिम पुन्हा एकदा वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे. फायझरने (Pfizer) याबाबतची माहिती दिली आहे. (Pfizer’s discussions with the Government of India are ongoing & we are hopeful to bring the Pfizer-BioNTech #COVID19 vaccine for use in the country: Pfizer)

Video: खूशखबर! रशियन Sputnik V चे भारतात उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी डोस बनणार


अमेरिकेची फायझर कंपनीची लस लवकरच भारतीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फायझरने याबाबचे स्टेटमेंट दिले असून कंपनी केवळ केंद्र सरकार आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेसाठी काम करत असलेल्या राष्ट्रीय संस्थांना लस देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशांतर्गत डोसचे वाटप आणि अंमलबजावणी ही स्थानिक सरकारांच्या आरोग्य व्यवस्थेकडे असेल असेही फायझरने म्हटले आहे. 

Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्ट
 



लस पुरवठ्यासाठी फायझर भारत सरकारसोबत चर्चा करत आहे. फायझर-बायोएनटेकची कोरोना लस लवकरच भारतीयांना मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असे कंपनीने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे 18 ते 44 वयोगटासाठी विविध राज्यांनी ग्लोबल टेंडर मागविली आहेत. मात्र, अमेरिकेची आणखी एक कंपनी मॉडर्नाने राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. आम्ही केवळ केंद्र सरकारलाच लस देऊ, तसा करार केला आहे, असे कंपनीने पंजाब आणि दिल्लीला कळविले आहे. यानंतर आता फायझरनेही सांगितल्याने या दोन कंपन्यांच्या लस या वयोगटासाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. 

Sputnik V production: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. पॅनेसिया वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे. स्पुतनिक लस ही कोरोनाविरोधात अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Pfizer’s discussions with the Government of India for corona Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.