मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:01 PM2021-04-22T14:01:22+5:302021-04-22T14:01:46+5:30

महिन्याच्या अखेरपर्यंत इंधनाचे दर वाढण्याची दाट शक्यता; पेट्रोल, डिझेल २ ते ३ रुपयांनी महागणार

petrol diesel prices likely to hike by rs 3 per litre after assembly elections 2021 | मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग

मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग

Next

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे देशातील सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आहे. देशातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं लॉकडाऊन लागू आहे. तर काही भागांत लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार संकटात आला आहे. अशा परिस्थितीत आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Hike) वाढू शकतात. तसं झाल्यास वाहतूक खर्च जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्योग जगताला म्हणाल्या, 'Wait & Watch'...

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन कंपन्या दर वाढवणार असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे. देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. पैकी ४ राज्यांमधील मतदान पार पडलं आहे. तर केवळ पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. त्यानंतर इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्ण

एएनआयच्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात. मात्र ही वाढ एकदाच होणार नाहीत. ती हळूहळू होईल. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत इंधनाची मागणी घसरली आहे. सध्या खनिज तेलाच्या एका बॅरलची किंमत ६६ डॉलर इतकी आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये २७ फेब्रुवारीपासून वाढ झालेली नाही. त्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात इंधनाच्या दरात चारवेळा कपात झाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ पैशांनी, तर डिझेलचे दर ७४ पैशांनी कमी झाले. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९०.४० रुपये, तर डिझेलचा दर ८०.७३ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९६.८३ रुपये, तर डिझेलचा दर ८७.८१ रुपये इतका आहे.

Read in English

Web Title: petrol diesel prices likely to hike by rs 3 per litre after assembly elections 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.