इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.69 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 09:29 IST2018-09-21T08:35:21+5:302018-09-21T09:29:07+5:30
पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे.

इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.69 रुपये
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत शुक्रवारी (21 सप्टेंबर) पेट्रोल 9 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 89.69 दर तर डिझेलचा प्रतिलिटर दर 78.42 झाला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.82.32 per litre & Rs.73.87 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.89.69 per litre & Rs.78.42 per litre, respectively. pic.twitter.com/7vRlnUMZRz
— ANI (@ANI) September 21, 2018
राजधानी दिल्लीत पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.32 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. मात्र, प्रशासन ही दरवाढ सर्वस्वी तेल कंपन्यांकडून होत असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. ‘अच्छे दिन’ हेच का? असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. इंधनाच्या दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे.