Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:28 AM2021-10-21T08:28:36+5:302021-10-21T08:29:24+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत.

Petrol-Diesel Price today: Petrol-diesel prices have risen again today, find out today's prices | Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव

Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव

Next

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel Price)च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 106.54 रुपये प्रति लिटरवर गेला आहे तर डिझेल 96.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी वाढ झाली असून आता ते 112.44 कुरए प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच, डिझेलच्या किंमतीमध्येही 37 पैशांनी वाढ झाली असून आता ते 103.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

प्रमुख शहरांमधील आजचा दर
>> दिल्ली पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपये प्रति लिटर
>> मुंबई पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 103.26 रुपये प्रति लिर
>> चेन्नई पेट्रोल 103.61 रुपये आणि डिझेल 99.59 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 98.38 रुपये प्रति लिटर
 

ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढ
आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.80 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.

दररोज सकाळी किंमती बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात, नवे दर सकाळी 6 पासून लागू केले जातात. अनेकवेळा दुसऱ्या दिवशीही सारखाच राहतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

सरकार इंधनावर कर लावते

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेल्या उसळीने 28 सप्टेंबरला पेट्रोल आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवर लागलेला ब्रेक संपवला. तेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीत 18 पट आणि डिझेलच्या किंमतीत 21 पट वाढ झाली आहे. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कावर आधारित इंधनाचे दर राज्यानुसार बदलतात. याशिवाय, केंद्र सरकार इंधनावर उत्पादन शुल्क लावते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 

Web Title: Petrol-Diesel Price today: Petrol-diesel prices have risen again today, find out today's prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app