खरंच देशातील पेट्रोल-डिझेल संपत आहे का? HPCL आणि BPCL ने दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:03 IST2026-03-06T18:02:55+5:302026-03-06T18:03:55+5:30
Petrol-Diesel Price: पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी हे नक्की वाचा...

खरंच देशातील पेट्रोल-डिझेल संपत आहे का? HPCL आणि BPCL ने दिली महत्त्वाची माहिती
Petrol-Diesel Price: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवांमुळे काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) आणि Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) यांनी सोशल मीडियावर अधिकृत माहिती देत देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट
गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. तज्ज्ञांच्या मते, अशा अफवांमुळे कृत्रिम टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सभी देशवासियों के लिए महत्वपूर्ण सूचना
— Bharat Petroleum (@BPCLimited) March 6, 2026
कुछ जगहों पर पेट्रोल और डीज़ल की कमी की अफवाहें पूरी तरह निराधार हैं। भारत में ईंधन का पर्याप्त भंडार है और आपूर्ति पूरी तरह सामान्य रूप से चल रही है।
BPCL पूरी तरह परिचालन में है और निर्बाध ईंधन आपूर्ति सुनिश्चित करने के लिए प्रतिबद्ध है।… pic.twitter.com/R0LT9Jgzbt
तेल कंपन्यांचे स्पष्टीकरण
HPCL आणि BPCL या दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा साठा मुबलक आहे आणि पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यपूर्वेतील तणाव किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार याबाबतच्या बातम्या अनेकदा चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते.
पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नका
तेल कंपन्यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. BPCLने आपल्या निवेदनात म्हटले की, सर्व ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. नागरिकांनी फक्त अधिकृत स्रोतांवरून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.
देशवासियों के लिए महत्वपूर्ण सूचना
— Hindustan Petroleum Corporation Limited (@HPCL) March 5, 2026
कुछ स्थानों पर पेट्रोल और डीज़ल की कमी को लेकर फैल रही अफवाहें निराधार हैं।
देश में ईंधन का पर्याप्त भंडार उपलब्ध है और सप्लाई चेन पूरी तरह सामान्य है।
सभी नागरिकों से अनुरोध है कि अफवाहों पर विश्वास न करें और अनावश्यक रूप से पेट्रोल पंपों पर…
भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत
भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत असल्याचा विश्वास सरकार आणि तेल कंपन्यांनी व्यक्त केला आहे. देशभरात पेट्रोलियम उत्पादनांचा आवश्यक साठा राखून ठेवला जात असल्याचे HPCLने सांगितले. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर काही तात्पुरती अडचण निर्माण झाली तरी, भारताकडे अनेक दिवस किंवा आठवड्यांसाठी पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे.