शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाच राज्यांच्या निवडणुका संपल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:15 IST

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका संपल्यामुळे केंद्र सरकार पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एका लीटरमागे दोन ते अडीच रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका संपल्यामुळे केंद्र सरकार पुन्हा पेट्रोलडिझेलच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एका लीटरमागे दोन ते अडीच रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही दरवाढ सोमवार ते बुधवार या काळात जाहीर केली जाईल, असे समजते.केंद्राने निवडणुकांआधी पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. त्यामुळे इंधन अडीच रुपयांनी स्वस्त झाले. तसे करण्यामागे दरवाढीमुळे लोकांमध्ये असलेली संतापाची भावनाही कारणीभूत होती. केंद्रापाठापोठ राज्य सरकारनेही इंधनांवरील कर कमी केला. तेव्हाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भावही कमी झाले आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाही बऱ्यापैकी सुधारला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत पेट्रोल व डिझेलचे दर खूप खाली आले. आताही तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात तुलनेने कमीच आहेत, पण इंधनाचे कमी होताच, सरकारचा महसूलही कमी होतो.गेले तीन महिने दर कमी झाले आणि त्या आधी केंद्राने करकपातही केली. त्यामुळे महसुलात मोठीच घट झाली. ही घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा अबकारी करात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. पेट्रोलवर आता एका लीटरला १८ रुपये ४८ पैसे, तर डिझेलवर लीटरमागे १४ रुपये ३३ पैसे अबकारी कर आकारला जातो. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही राज्ये भाजपाच्या हातातून गेली आणि त्यानंतर करवाढ केली, तर सरकारविषयी आणखी रागाची भावना लोकांत निर्माण होईल. त्यामुळे निकालांआधीच ही वाढ करावी, असा विचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकांआधी म्हणजे फेब्रुवारीपासून पुन्हा या इंधनाचे दर कमी केले जातील, अशी शक्यता आहे.तेल उत्पादनात होणार घटसरकार करवाढ करू पाहत असतानाच, कच्च्या तेलाच्या उत्पादनात रोज १.२ दशलक्ष बॅरलची विक्रमी कपात करण्याचा निर्णय तेल उत्पादक व निर्यातदार देशांनी (ओपेक) घेतला आहे. यामुळे भारतातील २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल महाग होण्याचा धोका आहे. अशा वेळी सरकारला जनतेला सवलत द्यावी लागेल. अन्यथा मोदी सरकारविरोधात वातावरण निर्माण करणे विरोधकांना सोपे होईल. आधीही हेच केलेयापूर्वी तेल कंपन्यांनी कर्नाटक निवडणुकीवेळी इंधन दरवाढ रोखून धरली होती. निवडणुका होताच सतत दरवाढ करण्यात आली होती. तेच आता परत घडणार असे दिसते.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडElectionनिवडणूकBJPभाजपा