Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 10:42 IST2018-11-10T09:34:45+5:302018-11-10T10:42:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे.

Petrol and diesel prices in Mumbai are Rs 83.40 per litreand Rs 76.05 respectively | Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त

ठळक मुद्देएक लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना आता 83.40 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईकरांना डिझेलसाठी 76.05 रुपये द्यावे लागणार आहेत.राजधानीत प्रतिलिटर पेट्रोल 77.89 रुपये तर डिझेल 72.58 रुपये आहे

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात 17 पैशांची घट होऊन एक लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना आता 83.40 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या दरात 17 पैशांची घट होऊन एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 76.05 रुपये द्यावे लागणार आहेत.



दिल्लीत पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झालं असून, राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 77.89 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 72.58 रुपये मोजावे लागणार आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

Web Title: Petrol and diesel prices in Mumbai are Rs 83.40 per litreand Rs 76.05 respectively