शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पोलीस चकमकींविरोधात न्यायालयांमध्ये याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:35 AM

सोमवारी सुनावणी; मानवाधिकार आयोगाने केली पाहणी

नवी दिल्ली : हैदराबादमधील बलात्कार प्रकरणी संशयावरून अटक करण्यात आलेले चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिल्याने त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथकही आज हैदराबादमधील घटनास्थळी गेले होते. तसेच त्या पथकाने पोलिसांकडून काही माहिती घेतली आहे. त्याआधारे आयोग आपला अहवाल देईल. या आयोगाने आधीच पोलिसांच्या कारवाईला आक्षेत घेतला होता. राष्ट्रीय महिला आयोगानेही संशयीत वा आरोपींना शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांचा नसून, न्यायालयाचा आहे, असेच म्हटले आहे. महिला आयोगानेही पोलिसांकडून चकमकींची माहिती मागवून घेतली आहे.

चारही संशयीतांना पोलीस चकमकीत ठार करण्याची पोलिसांची कृती सर्वोच्च न्यायालयाने पोलीस चकमकींसंदर्भात २0१४ साली ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे, असे अ‍ॅड सी. एस.मणी व अ‍ॅड. प्रदीपकुमार यादव यांनी याचिकेत म्हटले आहे. याखेरीज या चकमकींचे समर्थन करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी याचिका अ‍ॅड. मनोहरलाल शर्मा यांनी केली आहे.

तसेच तेलंगणा उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले आहे. मृत संशयीतांच्या पोस्ट मॉर्टेमचे चित्रिकरण सोमवारी आपल्याकडे सादर करावे आणि त्यांच्या मृतदेहांवर १0 डिसेंबर रात्री आठ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करू नये, असा आदेश न्यायालयाने या याचिकेच्या निमित्ताने दिला आहे.

बदल्याची कृती अयोग्यच : न्या. बोबडे

हैदराबादचे प्रकरण ताजे असतानाच, बदला घेण्याच्या भावनेने केलेली कृती म्हणजे न्याय नव्हे, असे स्पष्ट प्रतिपादन सरन्यायाधीशशरद बोबडे यांनी शनिवारी केले. या वा कोणत्याची घटनेचा उल्लेख न करता सरन्यायाधीश म्हणाले की न्यायामध्ये बदला घेण्याची भावनाअसली तर तो न्याय राहतच नाही. न्याय कधीच लगेचच्या लगेच वा घाईघाईत होत नसतो. त्यात घटनेची चौकशी व्हावी लागते. बदल्याच्या भावनेने केलेली कृती ही कधीच न्याय ठरू शकत नाही.

टॅग्स :PoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयhyderabad caseहैदराबाद प्रकरण