संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 12:05 IST2019-09-02T11:17:40+5:302019-09-02T12:05:20+5:30

संसदेत सोमवारी चाकू घेऊन एका तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

A person has been detained while he was trying to enter the Parliament allegedly with a knife | संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली - संसदेत सोमवारी (2 सप्टेंबर) चाकू घेऊन एका तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चाकू घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेट क्रमांक 1 मधून याने संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सागर इन्सा असं संसदेत चाकू घेऊन प्रवेश करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सागर हा दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी आहे. अचानक एक तरुण संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या लक्षात आले. तसेच त्याच्या हातात चाकू असल्याचे दिसले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. 

 

Web Title: A person has been detained while he was trying to enter the Parliament allegedly with a knife