Permission for human testing of ‘Oxford vaccine’ | ‘ऑक्सफर्ड लसी’च्या मानवी चाचण्यांना परवानगी

‘ऑक्सफर्ड लसी’च्या मानवी चाचण्यांना परवानगी

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड-१९ लसीच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील मानवी वैद्यकीय चाचण्या करण्यास पुण्यातील सेरम इन्स्टिट्यूफ आॅफ इंडियाला (एसआयआय) भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) परवानगी दिली आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, भारतीय औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी रात्री उशिरा ‘एसआयआय’ला चाचण्यांची परवानगी दिली. कोविड-१९ वरील ‘विषयतज्ज्ञ समिती’ने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीच्या अर्जानुसार ‘एसआयआय’कडून भारतीय प्रौढ व्यक्तींवर लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. लसीची मानवासाठीची सुरक्षितता आणि कोविड-१९ विषाणूला रोखण्याची तिची शक्ती या चाचण्यांत तपासून पाहिली जाणार आहे. या चाचण्या ‘आॅब्झर्वर-ब्लाइंड’, तसेच अनियमित नियंत्रित (रँडमाइज्ड कंट्रोल्ड) पद्धतीने घेतल्या जातील.
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, तिसºया टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यापूर्वी संस्थेला ‘डेटा सुरक्षा निगराणी बोर्डा’ने (डीएसएमबी) मूल्यांकन केलेला सुरक्षा डेटा ‘केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे (सीडीएससीआय) सादर करावा लागेल. अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या अभ्यास आराखड्यानुसार (स्टडी डिझाईन), चाचणीत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला चार आठवड्यांत लसीचे दोन डोस दिले जातील. पहिल्या दिवशी पहिला डोस दिला जाईल, त्यानंतर २९ व्या दिवशी दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर त्याच्या सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीच्या तपासण्या नियोजित वेळापत्रकानुसार ठराविक अंतराने केल्या जातील.

इतर देशांतही सुरू आहेत चाचण्या
च्आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘जेनर इन्स्टिट्यूट’ने ब्रिटिश-स्विडिश कंपनी ‘अ‍ॅस्ट्रा जेनेका’च्या भागीदारीत ही लस विकसित केली आहे. ‘एसआयआय’ ही जगातील सर्वांत मोठी लस निर्माती संस्था आहे.

च्या कंपनीला लसीच्या उत्पादनाची जबाबदारी मिळाली आहे. या लसीच्या दुसºया आणि तिसºया टप्प्यातील चाचण्या ब्रिटनमध्येही सुरू आहेत, तसेच ब्राझीलमध्ये तिसºया टप्प्यातील, तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या व दुसºया टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Permission for human testing of ‘Oxford vaccine’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.