शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् संतप्त स्थानिकांनी नगरसेवकालाच खुर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 12:15 IST

People Troubled by Water Logging : लोकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे.

वाराणसी - गटार, दूषित पाणी, कचरा अशा अनेक समस्यांचा सामना हा अनेकदा परिसरातील लोकांना करावा लागतो. नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रारही स्थानिकांकडून केली जाते. लोकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक काम करत नसल्याने स्थानिकांनी त्यांना दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना समोर आली आहे. वाराणसीच्या बलुवाबीरमध्ये ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या बलुवाबीर परिसरातील लोकांना गेल्या कित्येक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. नगरसेवकाकडे याबाबत सातत्याने तक्रार केली पण त्यानी याकडे दूर्लक्ष केलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकालाच दोरीने बांधून गटाराच्या दूषित पाण्यात बसवलं. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त असल्याने गावकऱ्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे. हे प्रकरण वाराणसी वॉर्ड क्रमांक 79 अंबियापूर बाजार क्षेत्रातील आहे. 

तुफैल अंसारी असं या नगरसेवकाचं नाव आहे. या वॉर्डशी संबधित जवळील भागात बऱ्याच काळापासून गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील लहान मुलं आजारी पडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. स्थानिकांनी गटाराच्या समस्येविषयी अनेकदा नगरसेवकाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी यावर कोणतीच उपाययोजना केली नाही. 

गटारांचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिकांना गटाराच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. त्याच दरम्यान नगरसेवक त्या परिसरातून जात असलेले लोकांनी पाहिले. त्याच पाण्यात नगरसेवकाला एका खुर्चीवर बसवण्यात आलं आणि दोरीने बांधलं. त्यानंतर या भागातील काही नागरिकांनी विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करीत नगरसेवकाची सुटका केली. लोकांनी केलेल्या या कृत्यांची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :VaranasiवाराणसीIndiaभारत