शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:43 IST

Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातसंविधान दिनाच्या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश म्हणाले की, गेल्या सात दशकांमध्ये, हजारो नागरिकांनी या संस्थेच्या माध्यमातून न्याय मिळेल या विश्वासाने काेर्टाच्या दाराशी संपर्क साधला. ही प्रकरणे न्यायालयासाठी केवळ दाखले किंवा आकडेवारी नाहीत, तर न्यायालयाकडून लोकांच्या अपेक्षा तसेच नागरिकांना न्याय देण्याची न्यायालयाची स्वत:ची  वचनबद्धता दर्शवतात. प्रत्येक न्यायालयातील प्रत्येक खटला हा घटनात्मक शासनाचा विस्तार आहे.

कायदे सरळ, सोपे करण्याची गरज- भारतीय संविधान हे देशांतील लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा 'जिवंत दस्तावेज' आहे. जेव्हा आपण देशातील कायदेप्रणालीचा, त्याच्या उद्देशांचा विचार करतो, तेव्हा हे कायदे अधिक सरळ आणि सोपे करण्याची गरज आहे. - कायद्यांना सध्याच्या युवा पिढीशी अनुकूल करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केले. 

सरन्यायाधीश म्हणाले...-सर्वोच्च न्यायालय हे कदाचित जगातील एकमेव न्यायालय आहे जिथे कोणताही नागरिक केवळ सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक यंत्रणेला गती देऊ शकतो.-मला आशा आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक वर्ग, जाती आणि धर्मातील नागरिक आमच्या न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सध्या भारत मातेचे म्युरल व महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूConstitution Dayसंविधान दिन