मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 22:22 IST2024-09-20T22:21:34+5:302024-09-20T22:22:02+5:30
Bihar News : हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच 'Bihar is not for beginner' म्हणाल.

मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
Bihar News : Bihar is not for beginner...बिहारमध्ये कधी कोणती विचित्र घटना घडेल, काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना...मुख्यमंत्री नितीश कुमार शुक्रवारी सहरसा जिल्ह्यातील अमरपूर येथे सरकारी योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यासाठी गेले होते. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागातर्फे बायोफ्लॉक(तात्पुरता माशांचा पूल) लावण्यात आला होता, ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे टाकण्यात आले होते. पण, कार्यक्रम आटोपल्यानंतर मासे लुटण्यासाठी अनेकजण बायोफ्लॉकवर तुटून पडले. या गर्दीसमोर सरकारी अधिकारीदेखील हतबल झाले होते.
मुख्यमंत्री नितीश कुमार आज सहरसामधील अमरपूर येथे सरकारी योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी आले होते. प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर सीएम नितीश कुमार हेलिकॉप्टरमधून पाटण्याला रवाना होताच, तिथे उपस्थित लोकांनी बायोफ्लॉकमधून मासे लुटण्यास सुरुवात केली. लोकांनी काही मिनिटांतच बायोफ्लॉमधील सर्व पाणी सांडून दिले आणि मासेही फस्त केले.
Bihar में CM के नाम पर फिश पार्टी, नीतीश कुमार के जाते ही लोगों ने लूटी सरकारी मछलियां, ताकते रहे अधिकारी
— Anil Thakur (@Ani_iTV) September 20, 2024
पूरा Video देखिए #Bihar#NitishKumar#Saharsapic.twitter.com/3SPVsaATx3
नितीश कुमारांना पाहायला नाही, मासे न्यायला आलो
मासे घेऊन जाणाऱ्या तरुणांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाहायला नाही, तर मासे घेण्यासाठी आले आहेत. मासे घेऊन जाणाऱ्या एका तरुणाने म्हटले की, मी नितीश कुमार यांना भेटलो नाही, पण आज फिश पार्टी नक्कीच करणार आहे. सुरुवातीपासून आमची नजर माशांवर होती. आज नितीश कुमार यांच्या नावाने आम्ही फिश पार्टी करू, असेही तो तरुण म्हणाला.