भ्रष्टाचार, सत्तेच्या दुरूपयोगाने जनता त्रस्त: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:15 IST2026-01-10T10:15:08+5:302026-01-10T10:15:24+5:30
राज्यात सत्ता हाती असलेल्या लोकांकडून कोणत्या व्हीआयपीचे रक्षण केले जात आहे असा सवालही त्यांनी केला.

भ्रष्टाचार, सत्तेच्या दुरूपयोगाने जनता त्रस्त: राहुल गांधी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा ‘भ्रष्ट जनता पक्ष’ असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. विविध राज्यांतील भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या भ्रष्टाचार, सत्तेचा दुरुपयोग, अहंकारामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्याकांड, उ.प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण, इंदूरमधील दूषित पाण्यामुळे झालेले मृत्यू अशी उदाहरणे दिली. उत्तराखंडमधील अंकिता भंडारीची क्रूर हत्या संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली. त्या राज्यात सत्ता हाती असलेल्या लोकांकडून कोणत्या व्हीआयपीचे रक्षण केले जात आहे असा सवालही त्यांनी केला.