शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सेक्स सीडीपेक्षा विकासाच्या सीडीमध्ये लोकांना जास्त रस -  हार्दिक पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 16:56 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रचार सभांच्या माध्यमातून गुजरातमध्ये रणांगण पेटले असताना, आता सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

ठळक मुद्देविकासाच्या सीडीमध्ये लोकांना जास्त रसनेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू हार्दिक पटेलच्या प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रचार सभांच्या माध्यमातून गुजरातमध्ये रणांगण पेटले असताना, आता सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. दरम्यान, या सेक्स सीडी प्रकरणानंतर हार्दिक पटेलच्या प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, या सेक्स सीडीचा हार्दिक पटेलला काहीही फरक पडत नाही. 

मंगळवारी भरुच येथे हार्दिक पटेलने प्रचारसभा घेतली. यावेळी या प्रचारसभेला अनेक लोकांनी हजेरी लावली होती. यावर हार्दिक पटेलने ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. गुजरातमधील लोकांना सेक्स सीडीपेक्षा गुजरातच्या 22 वर्षांच्या विकासाची सीडी पाहण्यास जास्त रस आहे, असे ट्विट हार्दिक पटेलने केले आहे. दरम्यान, सेक्स सीडीनंतर त्याची प्रतिमा खराब होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, असे न होता हार्दिक पटेलच्या प्रचारसभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

 हार्दिक पटेलने आपल्या प्रचारसभेत सेक्स सीडीबाबत किंवा भाजपासंबंधी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तो म्हणाला की, मी चुकलो असेन, पण विरोधकांकडून संधी मिळताच मला संपविण्यात सुद्धा येईल. मात्र, आरक्षण आणि पाटीदार समाजावर होणा-या अत्याचाराविरोधात मी सतत लढत राहणार आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचाच अवधी राहिला असताना निवडणुकीतील प्रचाराची पातळी घसरली आहे. हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून त्याचे चारित्र्य हनन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हार्दिक पटेलचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.  दरम्यान, व्हायरल करण्यात आलेल्या चार व्हिडीओ क्लीपपैकी एका क्लीपमध्ये हार्दिक पटेल हा मुंडन आंदोलनामध्ये मुंडन केल्यानंतर मौजमजा करताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहून गुजरात  सरकारचा निषेध करण्यासाठी हार्दिक पटेलसह पाटीदार नेत्यांनी मुंडन केले होते.  याप्रकरणी हार्दिक पटेल याला जिग्नेश मेवानी याची साथ मिळाली आहे. जिग्नेश याने सेक्स हा मुलभूत हक्क असून, कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावणे योग्य नसल्याचे म्हटले होते. तर हार्दिक पटेलने या प्रकाराचा पाटीदारांच्या आरक्षणाच्या मागणीवर आणि आंदोलनावर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.  मंगळवारी हार्दिक पटेलची एक सेक्स सीडी व्हायरल झाली होती.  या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि दोन तरुणी दिसत आहेत. हार्दिक पटेल याची एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ सोमवारी प्रसारित झाला होता. त्यानंतर वातावरण तापलेले असतानाच दुसरा व्हिडीओसुद्धा लीक झाला. या व्हिडिओमध्ये असलेला तरुण हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे.  दरम्यान, हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017