Pension: ‘पेन्शन एकटेच खाता का?’ डीवायएसपीला मुलाने चोपले, दिवट्या पोरासह बायकोही विरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:30 IST2023-04-21T06:30:40+5:302023-04-21T06:30:59+5:30

Pension: ‘पेन्शन तुम्ही एकटेच खाता, मला का देत नाही,’ असे म्हणत निवृत्त डीवायएसपीला त्यांच्या मुलाने बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शाहूपुरी परिसरातील गुलमोहर काॅलनीत घडली. मुलासह त्याच्या आईवरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pension: 'Does one eat pension alone?' DySP was attacked by son, son and wife also against. | Pension: ‘पेन्शन एकटेच खाता का?’ डीवायएसपीला मुलाने चोपले, दिवट्या पोरासह बायकोही विरोधात

Pension: ‘पेन्शन एकटेच खाता का?’ डीवायएसपीला मुलाने चोपले, दिवट्या पोरासह बायकोही विरोधात

सातारा : ‘पेन्शन तुम्ही एकटेच खाता, मला का देत नाही,’ असे म्हणत निवृत्त डीवायएसपीला त्यांच्या मुलाने बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शाहूपुरी परिसरातील गुलमोहर काॅलनीत घडली. मुलासह त्याच्या आईवरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष दादासाहेब गोडसे (३९), रेखा दादासाहेब गोडसे (५८) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत.  दादासाहेब (६७) हे पोलिस दलातून डीवायएसपी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.  घरात ते पेपर वाचत बसले होते. त्यावेळी मुलगा आशिष याने ‘पेन्शन तुम्ही एकटेच खाता, मला का देत नाही,’ असे म्हणत बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने काठीने त्यांच्या पायावर, हातावर, पाठीवर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर मुलगा त्यांना मारहाण करत असताना गोडसे यांची पत्नी रेखा हिने त्यांचे हात धरून मुलाला मारहाण करण्यास मदत केली. गोडसे हे गंभीर जखमी झाले. 

Web Title: Pension: 'Does one eat pension alone?' DySP was attacked by son, son and wife also against.