शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बालक लसीकरण; महाराष्ट्रात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण १६.५% 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 11:44 IST

देशातील २० ते २४ वर्षे वयोगटातील प्रत्येक चौथ्या महिलेचे १८ वर्षे वय पूर्ण होण्याच्या आधीच लग्न झाले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये नवजात शिशूंच्या मृत्यूचे २०१५-१६ साली असलेले १६.२ टक्के प्रमाण २०१९-२० साली १६.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सन २०१९-२० मध्ये अर्भके व ५ वर्षे वयाखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे २३.२ व २८ टक्के होते. राज्यात सहा वर्षे किंवा अधिक वयाच्या शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण ७९.६ टक्के आहे. राज्यात रुग्णालयांतील प्रसूतीचे प्रमाण ९४.७ तर प्रशिक्षित सुईणींकडून घरी बाळंतपणाचे प्रमाण २ टक्के  आहे.

१२ ते २३ महिने वयाच्या बालकांना लस देण्याच्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर ६२ वरून ७६ टक्क्यांपर्यंत वृद्धी झाली आहे. प्रसुती झालेली महिला व तिचे नवजात बालक हे अशक्त असण्याची आकडेवारी ६४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

विवाह लवकर - राज्यात १८ वर्षांआधी विवाह झालेल्या मुलींचे प्रमाण २१.९ टक्के असून, २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झालेल्या पुरुषांचे प्रमाण १०.५ टक्के आहे. तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८४.६ टक्के आहे. तर ७९.६% मुली शालेय शिक्षण घेतात.

लहान वयातच माता : महाराष्ट्रात महिलेचा सरासरी जननदर १.७ आहे. शहरांत तो १.५, तर ग्रामीण भागांत १.९ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे १५ ते १९ या वयात गर्भवती वा माता बनणाऱ्यांचे प्रमाण ७.६ टक्के आहे. शहरांत ३.९, तर ग्रामीण भागांत १०.६ टक्के मुली १५ ते १९ या वयोगटात गरोदर वा माता बनतात.

बालविवाहात २३% घट -देशातील २० ते २४ वर्षे वयोगटातील प्रत्येक चौथ्या महिलेचे १८ वर्षे वय पूर्ण होण्याच्या आधीच लग्न झाले आहे. गेल्या पाच वर्षांत बालविवाहांच्या प्रमाणात २६.८ वरून २३.३ टक्क्यांपर्यंत घट झाली असली तरी अशा प्रकारचे विवाह हा अजूनही अतिशय चिंतेचा विषय आहे. भारतात बालविवाहांचे प्रमाण ग्रामीण भागात २७ टक्के तर शहरांमध्ये १४.७ टक्के आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींपैकी ६.८ टक्के मुली या माता झालेल्या किंवा गर्भवती असतात. २५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांपैकी २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झालेल्यांचे प्रमाण ग्रामीण २१.१ टक्के व शहरांमध्ये ११.३ टक्के आहे. 

छळाचे प्रमाण ३१ टक्के -पत्नीचा घरात जो छळ होतो, त्यात शारीरिक व लैंगिक अत्याचारांचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावर १८ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांपैकी ३१.२ टक्के महिलांना अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते. १४ राज्यांमध्ये पत्नीचा छळ होण्याचे सर्वाधिक प्रमाण तामिळनाडूमध्ये ३८.१ टक्के आहे. नंतर उत्तर प्रदेश (३४.८ टक्के), झारखंड (३१.५). 

टॅग्स :marriageलग्नMolestationविनयभंगHealthआरोग्य