शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:16 IST

Crime News: एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे. 

जयपूरमधील एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जयपूर येथील व्यावसायिकाकडील मौल्यवान रत्ने आणि दागिने लुटून जेव्हा काही दरोडेखोर ते विकण्यासाठी मुंबईत आले. तेव्हा हे दागिने खरेदी करणाऱ्या  व्यक्तीने सदर दागिने खोटे असल्याचे सांगत या दरोडेखोरांची केवळ १ लाख रुपये देऊन बोळवण केली. सुरुवातीला मिळालेले लाखभर रुपये घेऊन हे दरोडेखोर समाधानी झाले. मात्र त्याने आपल्याला गंडा घातलाय हे समजताच त्यांना धक्का बसला. या चोरी प्रकरणी जेव्हा पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली तेव्हा त्यांनी एका व्यक्तीने  चोरीचे दागिने खरेदी करताना आपल्यालाच गंडा घातल्याची माहिती दिली. त्यावनंतर पोलिसांनी कारवाई करत अजय कुमार नट नावाच्या ज्वेलरला मुंबईतून अटक केली.

सदर दरोडेखोरांनी जयपूरमधील जौहरी बाजार येथील ज्वेलरी व्यापारी बृजमोहन गांधी हे कारने जात असताना एका चौकात दुचाकीवरू आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्या कारमधील मौल्यवान दागदागिन्यांची पिशवी कारची काच फोडून लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. तसेच दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तपासले असता एका चित्रफितीमध्ये महाराष्ट्रातील क्रमांक असलेली एक स्कूडी दिसली. त्यावरून पोलिसांनी तपासाची सूत्रे पुढे नेली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर भरतपूरमधील अनीपूर येथून धर्मवीर उर्फ राहुल जाट याला अटक केली. सुरुवातीला त्याने गुन्हा कबूल केला नाही. मात्र सीसीटीव्ही चित्रफीत दाखवल्यावर तो कबूल झाला. तसेच त्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये इतर आरोपींचीही नावंही सांगितली.

या दरोडेखोरांनी सदर लुटीचा माल मुंबईतील अजयकुमान नट नावाच्या व्यक्तीला विकला. मात्र अजय कुमार नट याने सदर दरोडेखोरांकडील मौल्यवान रत्ने आणि दागदागिने खरे नसल्याचे सांगत त्यांना केवळ लाखभर रुपये दिले. किमान एवढी तरी रक्कम मिळाली म्हणून हे दरोडेखोर आनंदित झाले. मात्र जेव्हा सदर चोरीची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आणि चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ऐकली तेव्हा त्यांना धक्का बसला.

दरम्यान, पोलिसांनी जेव्हा या प्रकरणी तीन आरोपींना जयपूर येथून अटक केली तेव्हा त्यांनी आपली फसवणूक करणाऱ्या अजय नट यालाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्याबाबत माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अजय नट याचा शोध घेऊन त्याला आणि त्याच्या मुंबईजवळील एका ठिकाणाहून  ताब्यात घेतले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानMumbaiमुंबईtheftचोरी