शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीयन्सना हवी पैशांपेक्षा मन:शांती

By admin | Updated: December 5, 2014 04:04 IST

कॅम्पस प्लेसमेंटवेळी मिळालेला प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्यांत तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. यात एका विद्यार्थी व विद्यार्थिनीने अन्य एका कंपनीचा सुमारे

कानपूर : आयआयटी कानपूरच्या चार विद्यार्थ्यांनी परदेशी कंपनीने दिलेला एक-एक कोटी रुपयांच्या वार्षिक पगार असलेल्या नोकरीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आयआयटीच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधीच्या नोकरीचा प्रस्ताव धुडकावून लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे.कॅम्पस प्लेसमेंटवेळी मिळालेला प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्यांत तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. यात एका विद्यार्थी व विद्यार्थिनीने अन्य एका कंपनीचा सुमारे ५० लाख रुपयांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांनी मानसिक शांततेसाठी कोट्यवधींचा हा प्रस्ताव धुडाकावून लावला आहे. येत्या काळात आणखी शिक्षण घेण्याची व संशोधन करण्याची या विद्यार्थ्यांची इच्छा आहे. आयआयटीमध्ये गेल्या १ डिसेंबर रोजी प्लेसमेंट मोहीम सुरू झाली असून यासाठी १,३०० विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती. चार दिवसांत सुमारे ९० कंपन्यांनी यात सहभाग घेतला. सर्वाधिक एक कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव याच कंपनीने या चार विद्यार्थ्यांना दिला होता. विविध कंपन्यांनी आतापर्यंत ४९० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे वार्षिक वेतन ४० ते ५० लाख रुपयांनजीक आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आयआयटी परिसरात चालणाऱ्या या मोहिमेत जवळपास २५० कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. यात देश-विदेशातील सर्व नामांकित कंपन्यांसोबतच सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे. > नकाराचा चौकारआयआयटीच्या प्लेसमेंट सेलचे प्रमुख दीपू फिलीप यांनी आज सांगितले की, ‘आयआयटीत बुधवारी एका परदेशी कंपनीने बीटेक व बीटेक ड्युएलच्या चार विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये निवडले. चार विद्यार्थ्यांना एक लाख ५० हजार डॉलर म्हणजे, सुमारे ९३ लाख रुपयांचे वार्षिक (टेक होम सॅलरी) व अन्य सुविधांसह एक-एक कोटी रुपयांच्या पॅकेजवर नोकरीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या विद्यार्थ्यांनी कंपनीचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.’