शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रश्नांबाबत पवारांची जेटलींशी चर्चा

By admin | Updated: August 23, 2016 06:19 IST

पवार यांनी सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या, इथेनॉलच्या तसेच साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या, इथेनॉलच्या तसेच साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. अरुण जेटली यांनी हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, साखर कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार डिस्टिलरीज सुरू केल्या. पण नंतर केंद्राने त्यासाठीची सवलत मागे घेतली असून, त्यामुळे पेट्रोल कंपन्यांना सवलत मिळत असून, कारखान्यांवर मात्र त्याचा भार पडत आहे. कारखान्यांचे हे नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचेच आहे. हा प्रश्न लक्षात येताच जेटली यांनी लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले.पीक कर्ज नाबार्डच्या वतीने जिल्हा बँकांना दिले जाते. गेली दोन वर्षे ५ टक्के कमी कर्ज दिले गेल्याने जिल्हा बँकांची अडचण झाली आहे. त्यामुळे कमी कर्जाच्या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, असे अर्थमंत्र्यांच्या कानावर घातले आहे. तसेच साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अर्शंी मागणीही जेटली यांच्याकडे केली आहे. या तिन्ही मागण्यांवर अर्थमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.