Lalu Prasad Yadav: लालूंच्या 'जबरा फॅन'साठी तेजस्वी यादव कार थांबवतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 12:23 IST2021-06-25T12:23:23+5:302021-06-25T12:23:47+5:30
लालूप्रसाद यादव यांच्या एका 'जबरा फॅन'सोबत तेजस्वी यादव यांची भेट झाली.

Lalu Prasad Yadav: लालूंच्या 'जबरा फॅन'साठी तेजस्वी यादव कार थांबवतात तेव्हा...
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव काल दोन महिन्यानंतर पाटणामध्ये दाखल झाले. पाटण्यात पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पक्षाचा वर्धापनदिन सोहळ्याबाबत चर्चा त्यांनी केली. वर्धानपन दिन नेमका कसा साजरा करायचा यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तसंच नितीन कुमार सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरता येईल यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर परतत असताना कार्यालयाबाहेर लालूप्रसाद यादव यांच्या एका 'जबरा फॅन'सोबत तेजस्वी यादव यांची भेट झाली. या फॅनसाठी तेजस्वी यादव यांनी आपला ताफा रोखला आणि त्याची विचारपूस केली.
'राजद'च्या कार्यालयाबाहेर लालूप्रसाद यादव यांचा एक चाहता उभा होता. पक्षाच्या बैठकीनंतर तेजस्वी यादव आपल्या कारमधून घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांची नजर या कार्यकर्त्यावर पडली. त्याचं कारण म्हणजे या कार्यकर्त्यानं त्याच्या छातीवर लालूप्रसाद यादव यांच्या चेहऱ्याचा टॅटू कोरला आहे. सचिन राम असं या कार्यकर्त्याचं नाव असून तेजस्वी यादव यांनी खास कार थांबवून त्याची विचारपूस केली. लालूप्रसाद यादव यांच्या ७४ व्या वाढदिवशी सचिन राम यानं त्याच्या छातीवर हा टॅटू गोंदवून घेतला होता.