भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:06 IST2025-11-05T17:06:10+5:302025-11-05T17:06:36+5:30

केवळ झारखंड, बिहारच नव्हे तर अनेक राज्यात मुली पुरवण्याचं काम करत असल्याचा दावा केला. पैसे मिळाल्यानंतर मुली पाठवल्या जातात असं सांगितले. 

Patna Sex scandal: BJP women office bearers, girls to provide for leaders; Seniors gave responsibility in Bihar elections | भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

पटना - मी नेत्यांना ओळखते, त्यांना ग्लॅमर मुली हव्या असतात. कुणी सिंगल तर कुणी डबल एन्जॉय करतात. त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार मुली पाठवल्या जातात. बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी जबाबदारी दिलीय, त्यामुळे काम सोपे झालंय. तुम्ही मला सामान्य लीडर समजू नका, मी अनेक बड्या नेत्यांच्या संपर्कात आहे असा दावा भाजपा महिला पदाधिकारी फूल जोशी यांनी केला आहे. त्या झारखंडमधील भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश मंत्री म्हणून काम करतात. पक्षाच्या आदेशावरून त्या बिहारमध्ये अभियान चालवत आहेत. 

१० जून २०२५ रोजी जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीप पासवान आणि त्यांची पत्नी किरण यांना सेक्स स्कँडलमध्ये अटक करण्यात आली. या पती-पत्नीचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट होते. दिलीप आणि पत्नी किरण यांच्या चौकशीत अनेक सुगावे हाती लागले. हे दोघे हाय प्रोफाईल मुलींचे फोटो व्हॉट्सअपवरून व्हिआयपी लोकांना पाठवत होते. मोठमोठ्या हॉटेलमध्ये मुली पाठवल्या जात होत्या. त्यात नेते आणि उद्योगपती यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीत नेत्यांना मुली पुरवठा करण्याचं प्लॅनिंगही पुढे आले. या चौकशीत पटना गर्ल्स हॉस्टेलचे धागेदोरे सापडले. दैनिक भास्करने याबाबत सविस्तर रिपोर्ट प्रकाशित केला आहे.

पटनात १२ हून अधिक गर्ल्स हॉस्टेल तपासण्यात आले, त्यातील ४ हॉस्टेलची ओळख पटली. AN कॉलेजजवळील एक गर्ल्स हॉस्टेलचं कनेक्शन झारखंडशी मिळाले. याठिकाणी धनबादला राहणारी मिस्टी वार्डन आहे जी भाजपा महिला नेत्या फूल जोशीच्या नेटवर्कचा भाग आहे. या मिस्टीचे कनेक्शन स्पा सेंटरशीही जोडले गेले आहे. याबाबत स्टींग ऑपरेशनही करण्यात आले. त्यात मोठ्या डीलसाठी असलेले पॅकेजही सांगण्यात आले. मुलींचे फोटो आणि पॅकेज मिस्टीने सांगितले. मिस्टीने झारखंडमधील धनबाद येथील हॉटेलमध्ये भाजपा नेत्या फूल जोशी यांना भेटवले. फूल जोशी मुलींची व्यवस्था करण्याचे काम करते. स्टिंग ऑपरेशनमध्ये फूल जोशीने केवळ झारखंड, बिहारच नव्हे तर अनेक राज्यात मुली पुरवण्याचं काम करत असल्याचा दावा केला. पैसे मिळाल्यानंतर मुली पाठवल्या जातात असं सांगितले. 

दरम्यान, या मुलींना पटनाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये ठेवले होते, मिस्टी तिथे सुरक्षेची गँरेंटी घेते. जेव्हा मुलींना बोलायचे असेल तेव्हा फूल जोशी आणि मिस्टी १२ हून अधिक मुलींसोबत व्हिडिओ कॉलवर बोलतात. झारखंड, यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड, नेपाळमधून मुलींसोबत व्हिडिओ कॉलने बोलणे होते. शिवाय मी मुली पुरवते, हे पक्षातील अनेकांना माहिती आहे. आमदारांनाही माहिती आहे परंतु कुणी मला थेट विचारले नाही. इतक्या बड्या नेत्यांसोबत मी संपर्कात असते, त्यामुळे सर्वकाही अलर्ट राहून काम करावे लागते असंही फूल जोशीने या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितले.
 

Web Title : बिहार में नेताओं को लड़कियां सप्लाई करने का आरोप भाजपा पदाधिकारी पर

Web Summary : भाजपा की फूल जोशी पर बिहार चुनाव के दौरान नेताओं को लड़कियां सप्लाई करने का आरोप। राजनेताओं, व्यापारियों और गर्ल्स हॉस्टल से जुड़े सेक्स रैकेट का पर्दाफाश, जोशी का कई राज्यों में नेटवर्क से संबंध।

Web Title : BJP Official Accused of Supplying Girls to Leaders in Bihar

Web Summary : BJP's Phool Joshi accused of supplying girls to leaders, especially during Bihar elections. A sex racket involving politicians, businessmen, and girls' hostels was exposed, linking Joshi to a wider network across states.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.