शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Pathaan Movie : 'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:35 IST

हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ?

Pathaan Movie : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण सिनेमात 'बेशरम रंग' गाण्यात फारच रंग उधळले आहेत असेच वाटते. बिकीनीच्या रंगांवरुन वाद चांगलाच पेटत चाललाय. भगव्या बिकीनीमुळे अयोध्येचे महंत यांनी सिनेमा थिएटरच जाळण्याची गोष्ट केली आहे. हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ?

उलेमा बोर्डाचे (Ulema Board) अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनी पठाण वर आक्षेप घेतला आहे. पठाण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भुमिका उलेमा बोर्डाने घेतली आहे. सैय्यद अनस अली एएनआयशी बोलताना म्हणाले, 'या चित्रपटाने मुस्लिम समाजीचीही भावना दुखावली आहे. या सिनेमाला केवळ मध्य प्रदेशच नाही तर पूर्ण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही. मुस्लिम समाजात पठाण खूप प्रतिष्ठित आहेत. यातून केवळ पठाणांची नाही तर संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम केले जात आहे. पठाण चित्रपटाचे नाव आणि त्यात महिलांचा अश्लील डान्स हे खपवून घेतले जाणार नाही.'

पठाण हे नाव काढून टाका 

सैय्यद अनस अली म्हणतात, 'मेकर्सने पठाण हे नाव काढून टाकले पाहिजे. शाहरुखला त्याच्या भुमिकेचे नाव बदलावे लागेल. त्यानंतर पाहिजे ते करा. पण आम्ही हा चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि एफआयआर सुद्धा करु. रिलीज थांबवण्यासाठी सगळं काही करु.'

मुस्लिम धर्माचे नाव खराब करण्याची परवानगी कोणालाही नाही

ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही (AIMTC) पठाण ला विरोध केला आहे. कमिटीचे अध्यक्ष पीरजादा खुर्रम मिया चिश्ती विरोध करताना म्हणाले, पठाण मधून मुस्लिमांच्या भावना भडकवल्या जात आहेत. मला २४ तासाच्या आत ४०० हून जास्त फोन आले आणि हा सिनेमा मुस्लिमविरोधात आहे असे सांगण्यात आले. सर्वात जास्त फोन बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकआणि तेलंगाणा मधून आलेत. मुस्लिम धर्माची प्रतिमा मलीन करण्याची करण्याची परवानगी कोणालाही नाही. मग तो शाहरुख खान असो किंवा अजून कोणी असो.'

Pathaan Movie : ज्या थिएटरमध्ये 'पठाण'चा शो असेल, ते पेटवून द्या; 'भगव्या बिकिनी'वरून अयोध्येतील महंतांची चिथावणी

'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे. मात्र सध्या सिनेमावलर बॉयकॉटची टांगती तलवार आहे.

टॅग्स :Pathan Movieपठाण सिनेमाMuslimमुस्लीमShahrukh Khanशाहरुख खानDeepika Padukoneदीपिका पादुकोणSocial Mediaसोशल मीडियाhindiहिंदीcinemaसिनेमा