शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्युचर रिटेल’च्या स्टोअर्समध्ये पतंजली ब्रँड तिसऱ्या स्थानी

By admin | Updated: August 27, 2016 04:41 IST

भारतभरातील स्टोअर्समध्ये गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) श्रेणीत बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या वस्तूंनी विक्रीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली

नवी दिल्ली : ‘फ्युचर रिटेल’ कंपनीच्या भारतभरातील स्टोअर्समध्ये गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) श्रेणीत बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या वस्तूंनी विक्रीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. फ्युचर समूहाचे सीईओ किशोर बियाणी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या क्रमांकावर हिंदुस्तान युनिलिव्हर असून, दुसऱ्या स्थानी प्रॉक्टर अ‍ॅड गॅम्बल आहे. पतंजली तिसऱ्या स्थानी आले आहे. फ्युचरच्या फडताळात पतंजलीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये प्रवेश केला होता. पतंजलीपाठोपाठ जीसीपीएल, डाबर आणि इमामी हे ब्रँड आहेत. दरमहा सुमारे २0 टक्क्यांची वाढ कंपनी करीत आहे. बियाणी यांनी सांगितले की, श्री श्री रविशंकर प्रणीत श्री श्री आयुर्वेदची एफएमसीजी उत्पादने विकण्याची आमची योजना आहे. त्यासाठी सध्या बोलणी सुरू आहे. फ्युचर समूहामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात समूहाला २६ हजार कोटी ते २७ हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, असे बियाणी यांनी सांगितले.पूजा साहित्यातही उडीपतंजली उद्योग समूहाने पूजा साहित्य क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पतंजली आस्था’ या नावाने शंभरपेक्षाही जास्त उत्पादने पतंजलीकडून बाजारात उतरविण्यात येणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)दिवाळीपूर्वी दीड हजार डीलर्ससोबत करारपतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, अनेक नामांकित कंपन्या अगरबत्ती आणि धूप यांसारख्या उत्पादनांत रसायने मिसळत असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. हे ग्राहकांसाठी हानिकारक आहे. आम्ही नैसर्गिक उत्पादने बाजारात उतरविणार आहोत. दिवाळीपूर्वीही आम्ही १,५00 डीलरांसोबत करार करीत आहोत. यांच्या तीन लाक्षांपेक्षा जास्त स्टोअर्समधून आमचे पूजा साहित्य दिसेल.