Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:55 IST2025-11-12T13:52:18+5:302025-11-12T13:55:28+5:30
Parvez Ansari Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. लखनौ दहशतवाद विरोधी पथकाने परवेज अन्सारी याच्या घरावर धाड टाकली. यावेळी महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
Delhi blast Parvez Ansari: जम्मू काश्मीरपासून सुरू झालेली धरपकड उत्तर प्रदेश, गुजरातपर्यंत पोहोचलेली असतानाच दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी स्फोट झाला. या स्फोटात १२ लोकांचे जीव गेले आणि अनेकजण जखमी झाले. त्यानंतर केंद्रीय आणि राज्यांमधील तपास यंत्रणांनी संशयित ठिकाणे पिंजून काढायला सुरूवात केली. जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनंतर चार डॉक्टरांना अटक करण्यात आली. यापैकी एक परवेझ अन्सारी! अन्सारी हा अटकेत असलेल्या शाहीन शाहीदचा भाऊ असून, एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने घरावर धाड टाकली. घराच्या झाडाझडतीमध्ये महत्त्वाचे गोष्टी हाती लागल्या आहेत.
पोलीस आणि एटीएसने आतापर्यंत अनेकांना अटक केली असून, या दहशतवादी नेटवर्कमध्ये पाच प्रमुख संशयित आरोपी आहेत. चार डॉक्टर असून, एक मौलवी आहे. परवेज अन्सारी हा, अटकेत असलेल्या शाहीन शाहीद हिचा भाऊ असल्याचे समोर आले आहे.
परवेझच्या घरात जुने मोबाईल, हार्ड डिस्क
लखनौ एटीएसने परवेझ अन्सारीच्या घरावर छाप टाकला. यात त्याच्या घरात अनेक संशयास्पद इलेक्ट्रॉनिक्स डिव्हासेस आढळून आली आहेत. लखनौ एटीएस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
परवेझ अन्सारीच्या घरात सहा की-पॅड मोबाईल मिळाले आहेत. हार्ड डिस्क आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स मिळाली आहेत. परवेझ तपास यंत्रणाच्या नजरेतून वाचण्यासाठी आणि संपर्क ठेवण्यासाठी की पॅड असलेले मोबाईल वापर असावा, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात डॉ. उमर नबी मारला गेला. त्याचा साथीदार असलेल्या डॉ. मुझम्मिल अहमद गणई यांच्याशी परवेझ सातत्याने संपर्कात होता. त्याचबरोबर परवेझ हा त्याची बहीण शाहीन शाहीद हिच्याशी संपर्क करण्यासाठी की पॅड मोबाईलच वापरत होता.
अटक होण्याच्या आठवड्याआधी राजीनामा
पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, डॉ. परवेझ लखनौतील एका विद्यापीठात नोकरी करत होता. अटक होण्याच्या एका आठवड्यापूर्वी त्याने राजीनामा दिला होता. परवेझ की पॅड मोबाईलचा वापर जम्मू काश्मीर, भारतातील इतर ठिकाणी आणि परदेशातील दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांशी बोलण्यासाठी करायचा.