शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; दिग्विजय सिंह म्हणाले, "आम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 11:00 IST

Congress : गोडसे समर्थकाच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर अनेकांनी व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देगोडसे समर्थकाच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर अनेकांनी व्यक्त केली नाराजीबाबूलाल चौरसिया यांनी शुक्रवारी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसेच्या प्रतीमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बाबूलाल कोण आहेत असा सवाल केला. "कोण आहेत बाबूलाल चौरसिया? खुनी विचारधारा ज्यानं महात्मा गांधींची हत्या केली ती आजही जीवंत आहे. आम्हाला याची लाज वाटते," अशा शब्दात त्यांनी टीका केली. "गोडसेचं मंदिर उभारणं आणि त्यानंतर त्याला गांधींच्या विचारधारेशी एकत्र करणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. यामुळेच आपण विरोध केला आहे," असं मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी व्यक्त केलं. मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. मध्य प्रदेश काँग्रेसकडून बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. विशेष म्हणजे बाबुलाल चौरसिया यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत हिंदू महासभेत प्रवेश केला होता. हिंदू महासभेच्या तिकिटावर पालिका निवडणूक लढत जिंकली होती. 

मी जन्मापासूनच काँग्रेसवाला"मी जन्मापासूनच काँग्रेसवाला आहे. नथुराम गोडसेला श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आले, असा आरोप करत आपण यापूर्वीही काँग्रेसमध्ये होतो. आपण कुटुंबात पुन्हा परतलो आहे, असं बाबुलाल चौरसिया म्हणाले. 

गांधी कुटुंब मोठ्या मनाचे"काँग्रेसने राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. गांधी कुटुंब मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे," असं ग्वाल्हेरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी सांगितलं. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशNathuram Godseनथुराम गोडसेDigvijaya Singhदिग्विजय सिंहRahul Gandhiराहुल गांधीgwalior-pcग्वालियर