Parliament Winter Session: 'संसदेत आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी'- शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 21:03 IST2022-11-18T21:02:54+5:302022-11-18T21:03:12+5:30
Winter Session of Parliament: 'यामुळे बोलण्याची संधी मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार दूर करता येईल.'

Parliament Winter Session: 'संसदेत आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी'- शशी थरूर
Winter Session of Parliament 2022: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी संसदेच्या सर्व विभागांशी संबंधित स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत समित्यांच्या कारभारात सुधारणा करण्याबरोबरच संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राधामोहन सिंग, जगदंबिका पाल, सुशील मोदी आणि इतर नेते यांच्यासह काँग्रेस नेते शशी थरूरही उपस्थित होते. थरूर हे रसायन आणि खते मंत्रालयाशी संलग्न असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
हिवाळी अधिवेशन कधी होणार?
संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अनेकदा गदारोळ होऊन त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होतो. आपल्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सातत्याने करत आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली.
बैठक कशासाठी घेतली?
यावेली बोलताना शशी थरूर यांनी सुचवले की विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी मिळावी यासाठी अधिवेशनात आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा, ज्यावर फक्त विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलण्याची संधी मिळेल. असे करून बोलण्याची संधी मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार दूर करता येईल.
बैठकीत जगदीप धनखर यांनी स्थायी समित्यांच्या कामकाजात अधिक सुधारणा करण्यासाठी सर्व सभापतींशी संवाद साधला. बैठकीत उपस्थित नेत्यांनी सांगितले की, स्थायी समितीच्या बैठकांमध्ये सर्वच पक्षांचे खासदार प्रामाणिकपणे आपले म्हणणे मांडतात आणि बहुतांश विषयांवर एकमतानेच अहवाल तयार केला जातो. स्थायी समित्यांच्या कामकाजावर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे बैठकीत उपस्थित एका नेत्याने सांगितले.