शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:42 IST

Parliament Budget Session: मुस्लिम आरक्षण संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला, तर खरगे म्हणतात- हे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही.

Congress Vs BJP: राज्यसभेत सोमवारी (24 मार्च) कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणावरुन बराच गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते जेपी नड्डा यांनी हे आरक्षण घटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तर, याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते खरगे यांनी, आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही, असे ठणकावून सांगितले.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. गरज भासल्यास राज्यघटना बदलण्यासही तयार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले होते, असा आरोप त्यांनी केला. हे विधान एखाद्या सामान्य व्यक्तीकडून आले असते, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असते, पण घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे हे विधान अत्यंत चिंताजनक आहे, असेही रिजिजू म्हणाले.

संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरुन तीव्र वादकाँग्रेसवर निशाणा साधत रिजिजू म्हणाले की, विरोधक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गळ्यात घालून फिरतात, पण आता ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. संविधान बदलून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची काय योजना आहे? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपाचे खंडन करत काँग्रेसचा संविधानाशी छेडछाड करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले.

जेपी नड्डांचा पलटवारभाजप नेते जेपी नड्डा यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लीम आरक्षणावर वक्तव्य करताना हे संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, असे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. काँग्रेस संविधान रक्षणाचा ढोल बडवते, पण आता तोच पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

खर्गेंचा पलटवारतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपाचे खंडन करत भारताची राज्यघटना वाचवण्याचे काम केवळ काँग्रेसनेच केल्याचे म्हटले. राज्यघटना बदलण्याची कोणतीही शक्यता नसून या सर्व अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकMuslimमुस्लीमreservationआरक्षण