शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:18 IST

Paris-Mumbai Vistara Flight Bomb Threat: विस्‍ताराच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडल्याने मोठी खळबळ उडाली.

Paris-Mumbai Flight Bomb Threat : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील पत्र मिळाल्यामुळे क्रु-मेंबर्स आणि 306 प्रवाशांमध्ये प्रचंड खबराट पसरली. यानंतर तात्काळ विमानाचीमुंबईविमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्वजण सुरक्षित आहेत. यापूर्वी चेन्नईहून मुंबई आणि दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानांमध्येही बॉम्ब असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, तपासात काहीच सापडले नाही.

सविस्तर माहिती अशी की, पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विस्ताराची फ्लाइट क्रमांक UK 024 मुंबईला येत होती. यावेळी विमानात बॉम्ब असल्याचे पत्र क्रु-मेंबर्सच्या हाती लागली. याबाबत तात्काळ मुंबई विमानतळाला माहिती देण्यात आली. यानंतर रविवारी सकाळी 10:19 वाजता मुंबई विमानतळावर विमानाची ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. लँडिंगनंतर विमानातील 294 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढले. 

इंडिगो विमान उडवण्याची धमकीयापूर्वी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. फ्लाइट क्रू मेंबरला एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. बॉम्बची धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही.

 

टॅग्स :airplaneविमानBombsस्फोटकेParisपॅरिसMumbaiमुंबईAirportविमानतळ