शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:22 IST

Rajasthan Jaisalmer Bus Fire News: जैसलमेर बस दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्ख कुटुंब जळून खाक झाले.

राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) दुपारी एका एसी बसला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या हृदयद्रावक घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्ख कुटुंब जळून खाक झाले.

जैसलमेरमधील आर्मी डेपोत कार्यरत असलेले महेंद्र मेघवाल (वय, ३५) हे आपल्या कुटुंबासह जैसलमेरहून जोधपूरला घरी परतत होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या बसला आग लागली आणि त्यांचे अख्खं कुटुंब जळून खाक झाले. या दुर्दैवी अपघातात महेंद्र यांच्यासोबत त्यांची पत्नी पार्वती मेघवाल , मुलगी खुशबू मेघवाल , मुलगी दीक्षा मेघवाल आणि मुलगा शौर्य मेघवाल यांचाही मृत्यू झाला आहे. महेंद्रच्या देचू येथील घरी त्यांची वृद्ध आई आपल्या नातवंडांची आणि मुलाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, आपल्या लाडक्या मुलाचे आणि संपूर्ण कुटुंबाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त ऐकून त्यांना मोठा धक्का बसला.

मृतांची ओळख पटवणे कठीण

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, बस जळून खाक झाली, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस आणि प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली आहे. 

महेंद्रच्या आईला जोधपूर येथे आणण्याचा प्रयत्न

पोलीस सध्या महेंद्रच्या वृद्ध आईला जोधपूर येथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आवश्यक असल्यास, डीएनए चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या एका टीमला जोधपूरहून देचूला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. या असह्य वेदना आणि शोकाकुल वातावरणाने या भीषण अपघाताची तीव्रता अधोरेखित केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaisalmer Bus Tragedy: Entire Family Burnt to Death in Accident

Web Summary : A horrific bus fire in Jaisalmer killed 20, including a family of five from Jodhpur. Mahendra Meghwal, his wife, two daughters, and son perished, leaving his elderly mother devastated. Identification is difficult due to the severity of the fire.
टॅग्स :fireआगRajasthanराजस्थान