शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वमग्न मुलांच्या पालकांची बदली नाही

By admin | Updated: November 18, 2014 00:19 IST

स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही

नवी दिल्ली : स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही तर बदली नाकारणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठीही बाध्य केले जाणार नाही़कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे़ अपंग मुले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलीत सवलत आहे़ आता यात ज्यांची मुले आॅटिज्मने पीडित आहेत, अशा कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे़ आॅटिज्मने प्रभावित मुलांची कायम काळजी घ्यावी लागते़ त्यामुळेच आॅटिज्मलाही ‘अपंग’ श्रेणीत सामील करण्यात आले आहे़ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे अपंग मुलांचे पालक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर घालता कामा नये़ असे कर्मचारी बदली नाकारत असतील तर त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगणे हेही गैर आहे़ कारण अपंग मुलांचे पालनपोषण आणि पुनर्वसनासाठी पैशांची गरज असते़ अशा स्थितीत व्हीआरएसमुळे अपंग मुलाच्या पुनर्वसन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम संभवतो, असे आदेशात म्हटले आहे़अपंग श्रेणीत अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णदोष, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, मतिमंदत्व, गतिमंदत्व, मानसिक आजार आदींचा समावेश आहे़ आॅटिज्म एक मनोवस्था आहे़ यात पीडितास संवाद साधण्यास प्रचंड अडचण येते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)