हाती काम नसलेला वकील बनला पाणीपुरी विक्रेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:55 PM2020-07-18T22:55:43+5:302020-07-18T22:55:53+5:30

प्रताप यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे न्यायालये काही काळ बंद होती.

Panipuri seller became a lawyer who did not have a job | हाती काम नसलेला वकील बनला पाणीपुरी विक्रेता

हाती काम नसलेला वकील बनला पाणीपुरी विक्रेता

Next

बंगळुरू : कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे न्यायालये बंद असल्याने व हातात काहीच काम न उरल्याने रोजीरोटी कमाविण्यासाठी कर्नाटकमधील एका वकिलाने आपल्या गावी चक्क पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता त्याला तोंड कसे द्यायचे याचा आदर्शच या वकिलाने घालून दिला.

या वकिलाचे नाव प्रताप गौडा व्ही. एस. (वय ३०) असे असून ते कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातल्या मद्दूर तालुक्यातील वालागेरेहळ्ळी या गावचे मूळ रहिवासी आहेत. ते बंगळुरू येथील एका ज्येष्ठ वकिलाकडे गेल्या सहा वर्षांपासून सहायक वकील म्हणून काम करत होतो. कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये न्यायालये बंद होती. त्या काळात हाताला काहीच काम न उरल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता प्रताप यांची पावले आपल्या गावाकडे वळली.

यासंदर्भात प्रताप यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे न्यायालये काही काळ बंद होती. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज आॅनलाइन सुरू झाले, तरी दिवसभरात खूपच कमी प्रकरणांची सुनावणी होत असते. या साऱ्या घडामोडींमुळे हातात फारसे काम नव्हते. माझ्यासाठी जगण्याचा संघर्ष मोठा आहे. त्यामुळे अखेर वकिलीचा पेशा थोडावेळ बाजूला ठेवून गावी पाणीपुरीचा व्यवसाय करण्याचे ठरविले.

वकील प्रताप गौडा यांचे गेल्या वर्षी लग्न झाले असून या दाम्पत्याला एक मुलगी असून ती अवघ्या एक महिन्याची आहे. कोरोना साथीच्या काळात वकिलीच्या पैशातून पैसे कमावणे शक्य नाही. तसेच दुसºयाकडे नोकरी करणे आपल्याला जमणार नाही हे लक्षात आल्याने वकील प्रताप गौडा यांनी गावात जाऊन व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांना पहिल्यापासून उत्तम स्वयंपाक करता येतो. हे कौशल्य आता पाणीपुरीचा व्यवसाय करताना त्यांच्या कामी आले.

१० हजारांच्या भांडवलावर नवा व्यवसाय केवळ १० हजार रुपयांच्या भांडवलावर अ‍ॅड. प्रताप गौडा यांनी घराच्या एका कोपºयात व्यवसाय सुरू केला. त्यांच्या स्टॉलवर पाणीपुरीच नाही तर मसाला पुरी, अंडा राईस, कोबी मंचुरिअन, आॅम्लेट व अन्य पदार्थही मिळतात. ते रोज दीड हजार रुपयांचा व्यवसाय करतात.

Web Title: Panipuri seller became a lawyer who did not have a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.