शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

"नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!"; PM मोदींचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 20:23 IST

"लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत." 

भारतात सर्वात मोठे दलित विरोधी, ओबीसी विरोधी आणि आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, ते काँग्रेस कुटुंब आहे. एवढेच नाही तर, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल, असे नेहरू म्हणाले होते. हे नेहरूंचे शब्द आहेत, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. ते हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर... -मोदी म्हणाले, "भारतात सर्वात मोठे दलित विरोधी, ओबीसी विरोधी, आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, ते काँग्रेस कुटुंब आहे. आता या लोकांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये आल्यास, दलित आणि मागास समाजाचे आरक्षण रद्द करणार. हेच या कुटुंबाचे सत्य आहे. काँग्रेसचे कुटुंब पहिल्यापासूनच बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत होते. आरक्षणाला घोर विरोध करत आले आहे. या कुटुंबाने नेहमीच दलीत, ओबीसी आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत." 

ओबीसी आरक्षण, पंडित नेहरू अन् इंदिरा गांधींचा उल्लेख -ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "ओबीसी आरक्षणासाठी ज्या काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली होती, त्याचा जो अहवाल आला होता, तो ओबीसी समाजाचे भाग्य बदलणारा होता. मात्र पंडित नेहरूंनी तो थंड बासनात टाकला. नेहरूंनंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांनीही ओबीसी आरक्षण आडवून ठेवले. जेव्हा देशाने त्यांना शिक्षा केली, जनता पक्षाचे सरकार आले, मोरांजी भाईंच्या नेतृत्वात मंडल आयगाची स्थापना झाली. मत्र नंतर पुन्हा काँग्रेस आली, त्यांनी मंडल आयोगाचा अहवालही थंड बासनात टाकला..." 

... तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला -...यानंतर राजीव गांधींनीही आपल्या सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण मिळू दिले नाही. जेव्हा केंद्रात भाजपच्या समर्थनाने व्हीपीसिंहांचे सरकार बनले, तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला. (व्हीपीसिंहांचे सरकार आले होते, अटलजींच्या जनसंघाने/भाजपने समर्थन केले होते.)  तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. जेव्हा भाजपचे समर्थन होते," असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसreservationआरक्षणSC STअनुसूचित जाती जमातीOBC Reservationओबीसी आरक्षण