शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:24 IST

पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले.

पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, आता सिंधू जल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. 'संसद किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता पाकिस्तानसोबत करार सिंधू जल करार केल्याचा आरोप केला.

'नेहरूंनी देशाच्या हिताच्या किंमतीवर आपली प्रतिमा उजळवण्यासाठी हे केले,  ८० टक्क्यांहून अधिक पाणी पाकिस्तानला वापरण्याची परवानगी देण्यात आली, असंही मोदी म्हणाले. 

पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...

'तसे झालेच नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार त्या काळातील पापे धुवत आहे, नेहरूंनी नंतर एका सहकाऱ्याला सांगितले की त्यांना विश्वास आहे की हा करार पाकिस्तानसोबतच्या इतर समस्या सोडवण्यास मदत करेल, परंतु तसे झाले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत ही टीका केली. या दरम्यान त्यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचाही सत्कार केला. याशिवाय, त्यांनी विरोधी पक्षांसह सर्व पक्षांना एकमताने राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करण्याचे आवाहन केले.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन

 पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे, अलिकडेच पुतिन आणि अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कात भेट झाली. त्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. आता त्या भेटीनंतर पुतिन यांनी थेट पीएम मोदींना फोन केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पीएम मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, "आताच मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अलास्कामध्ये झालेल्या अलिकडील भेटीची आणि चर्चेची माहिती दिल्याबद्दल पुतिन यांचे आभार. भारताने युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात देवाणघेवाणीची अपेक्षा करतो," असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा