पाकिस्तानची सीमा हैदर पुन्हा आई होणार, सचिनच्या बाळाला काय नाव देणार? सांगितली दोन नावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:13 IST2024-02-14T17:10:50+5:302024-02-14T17:13:55+5:30

सीमा हैदरने दिलेल्या माहितीनुसार, ती लवकरच सचिनच्या मुलाची आई होणार आहे.

Pakistan's Seema Haider will be a mother again, what will Sachin's baby be named Told two names | पाकिस्तानची सीमा हैदर पुन्हा आई होणार, सचिनच्या बाळाला काय नाव देणार? सांगितली दोन नावं!

पाकिस्तानची सीमा हैदर पुन्हा आई होणार, सचिनच्या बाळाला काय नाव देणार? सांगितली दोन नावं!

पबजी खेळता खेळता नोएडातील सचिन नामक तरुणाच्या प्रेमात पडलेली आणि नंतर पती, कुटुंब अन् देश सोडून आपल्या चार मुलांसह पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आता सचिनच्या बाळाची आई होणार आहे. तिने या पूर्वीच यासंदर्भात माहिती दिली होती. ती सचिनच्या पहिल्या तर स्वतःच्या पाचव्या बाळाळा जन्म देणार आहे. आता तिने आपल्या या होणाऱ्या बाळाचे नाव काय ठेवायचे हेही निश्चित केले आहे. 

सीमा हैदरने दिलेल्या माहितीनुसार, ती लवकरच सचिनच्या मुलाची आई होणार आहे. एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाली की, ती याच वर्षात आई होणार आहे. मात्र ती किती महिन्यांची गरोदर आहे, हे स्पष्ट झालेले नाही. एवढेच नाही, तर मुलगी झाल्यास आपण तिचे नाव मीरा ठेवणार आणि मुलगा झाला तर त्याचे नाव भगवान श्रीकृष्ण यांच्या नावावर ठेवणार असल्याचेही तिने म्हटले आहे.

गेल्या वर्षात, सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमाची चर्चा केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तानातही होती. नववर्षात सीमाने ही गूड न्यूज दिली आहे. सचिनच्या वडिलांनीही सीमा हैदरच्या गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुलाखतीदरम्यान सचिनच्या वडिलांनी सांगितले की, सुनेचा हात पाहिला आहे, नक्की मुलगाच होणार. ज्याचा हात बघूनसांगतो, ते कधीच खोटे होत नाही.

Web Title: Pakistan's Seema Haider will be a mother again, what will Sachin's baby be named Told two names