शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा 11 जवानांना मारल्याचा दावा खोटा - भारतीय लष्कर

By admin | Updated: November 17, 2016 09:38 IST

14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे. भारतीय लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक खोटे दावे केले जात आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, 14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे.
 
मात्र, भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळून लावले आहे. '14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच 14 नोव्हेंबर रोजी भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचा दावादेखील खोटा आहे', असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.  
 
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले. यासंदर्भात बोलताना, 'नियंत्रण रेषेजवळ भारताने केलेल्या गोळीबारात ज्या दिवशी पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने जवळपास 11 भारतीय जवानांना मारले', असा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी केला.  
 
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानने जवळपास 40-44 भारतीय सैनिकांना मारल्याचेही राहील शरीफ म्हणाले आहेत. मात्र भारतीय लष्कर ही बाब स्वीकारण्यास नकार देत असून झालेले नुकसान स्वीकारण्याची हिंमत भारताने दाखवावी, असा कांगावादेखील राहील यांनी केला आहे.  तसेच 'आक्रमक कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही', असा संदेशदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.