Pakistani shelling kills woman, a serious, sharp response from the Indian Army | पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर

पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर

जम्मू : पाकिस्तानच्या लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भागांत बुधवारी केलेल्या जोरदार तोफमाऱ्यांत एक महिला ठार, तर दुसरी गंभीर जखमी झाली. रात्री २ वाजेच्या सुमारास बालाकोट आणि मेंधार सेक्टर्समध्ये तोफमारा सुरू झाला. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्त्युतर दिले, असे पोलीस अधिकारी म्हणाला.
लांजोटे खेड्यात रेशम बी (६५) या ठार झाल्या, तर हकाम बी या गंभीर जखमी झाल्या. दोघींनाही रुग्णालयात नेण्यात आले. रेशम बी यांचा तेथे मृत्यू झाला, तर हकाम बी यांना जम्मूतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांनी मारा करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंनी ४५ मिनिटे तोफमारा सुरू होता, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

English summary :
Pakistani shelling kills woman, a serious, sharp response from the Indian Army

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistani shelling kills woman, a serious, sharp response from the Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.