पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 20:49 IST2019-08-15T20:27:20+5:302019-08-15T20:49:18+5:30

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे.

pakistan violates ceasefire in kg sector 3 pak soldiers killed in indian forces retaliation firing | पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्यातच काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. आज देखील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. मात्र भारतीय जवानांनी देखील त्यांच्या या नापाक कृत्याला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं पूँछमधील केजी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. तसेच खोट्या अफवा पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या इंटर- सर्विसेज पब्लिक रिलेशंस संस्थेने देखील पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबुल केले आहे. परंतु या चकमकीत पाकिस्तानच्या सैनिकांकडून भारताचे 5 जवान शहीद झाल्याचा दावा केला. मात्र पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा भारतीय लष्कराने सांगितले. 

भारतीय लष्कराचे नॅार्दन कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपासून पाकिस्तानाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु भारतीय लष्कर पूर्णपणे सर्तक असून घुसखोरीच्या प्रयत्नांना उधळून लावले आहे. तसेच पाकिस्तानचे नापाक कृत्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही अशी पाकिस्तानला तंबी देखील दिली. 

Web Title: pakistan violates ceasefire in kg sector 3 pak soldiers killed in indian forces retaliation firing