आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!

By Admin | Updated: September 24, 2016 03:45 IST2016-09-24T03:45:11+5:302016-09-24T03:45:11+5:30

उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले

Pakistan ready with Operation Plan! | आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!

आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!


नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे. भारतातील लक्ष्यही त्यांनी निश्चित केले आहे. जिओ टीव्हीने सांगितले की, सीमेपलीकडील कारवाईसाठी तयारी करण्यात आली आहे. सैन्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शब्द दिला आहे की, उरीतील हल्लेखोरांवर निश्चित कारवाई केली जाईल. (वृत्तसंस्था)
>पाकने आता स्वत:ला आतंकिस्तान म्हणावे - शाहनवाज हुसेन
संयुक्त राष्ट्र आमसभेच्या व्यासपीठाचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दुरुपयोग केला असून, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून द्यावे, असे भाजपाने शुक्रवारी म्हटले. पाकिस्तान हाच दहशतवादाचे मूळ असून, त्याने आता स्वत:ला ‘आतंकिस्तान’ म्हणावे, असे पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले. पाकिस्तानने स्वत:च्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे हुसेन यांनी म्हटले. हिजबुलचा अतिरेकी बुऱ्हान वनी याचा गौरव केल्याबद्दल शरीफ यांच्यावर हुसेन यांनी टीका केली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून बलुचिस्तान कसे वाचवता येईल याचा विचार करावा, असे हुसेन म्हणाले.

Web Title: Pakistan ready with Operation Plan!