अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 03:17 IST2025-05-17T03:17:06+5:302025-05-17T03:17:37+5:30

सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

pakistan likely to face water crisis from afghanistan india financial and technical support for shahtoot dam | अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकिस्तानची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. भारत व अफगाणिस्तानचे उत्तम संबंध आहेत. अफगाणिस्तानमध्ये काबुल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारताने सहकार्य दिले असून, ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होऊ शकतो.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने अफगाणिस्तानशी प्रथमच चर्चा केली आहे. 

संवेदनशील विषय

अफगाणच्या हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवेश करणाऱ्या काबुल नदीवर बांधले जाणारे हे धरण हा पाकिस्तानसाठी संवेदनशील विषय आहे. काबुल नदी हा सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे.

कुणार धरणामुळेही अडचण? : कुणार नदीवर आणखी एक मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्याची तालिबान सरकारने घोषणा केली. हिंदूकुशमध्ये उगम पावणारी कुणार नदी पुढे काबुल नदीला मिळते व पाकिस्तानात प्रवेश करते. तिथे जलविद्युत प्रकल्प झाला तर पाकच्या पाणी पुरवठ्याला फटका बसणार आहे.

 

Web Title: pakistan likely to face water crisis from afghanistan india financial and technical support for shahtoot dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.