पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST2025-04-27T14:18:42+5:302025-04-27T14:20:13+5:30
बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला.

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
मंगळवारी जम्मू-काश्मीरधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी या विरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत-पाकिस्तान याच्याील संबंधावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरही चर्चा केली.
विकास दिव्यकीर्ती यांनीही या दहशतवादी घटनेत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, कोणी स्वतःचे पाय कुऱ्हाडीने का कापेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम तेथील पर्यटनावर होईल. याचा थेट परिणाम काश्मिरी लोकांच्या उत्पन्नावर होईल. तिथे पूर्वी २०-२२ लाख पर्यटक येत होते, तिथे आता २-२.५ कोटी लोक येत आहेत.
विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आजकाल पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यादवी युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते. 'पाकिस्तानची सध्याची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तान कधीही घडू शकते. एकाच वेळी २-३ बाळांचा जन्म होण्याची शक्यता आहे. ही बातमी कधीही येऊ शकते. तिथे ट्रेनचे अपहरण होते यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. जगभरात त्यांचे नाव खराब झाले आहे. त्यांना हे प्रकरण दाबायचे आहे, म्हणूनच ते अशा गोष् घडवून आणत आहेत, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.
पाकिस्तानचे दोन, तीन भाग होणार
बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा उल्लेख करत विकास दिव्यकीर्ती म्हणाले, जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानचे अनेक भाग होऊ शकतात. विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती असहाय्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तेथील सामान्य नागरिक महागाई, अस्थिरता आणि दहशतवादाने त्रस्त आहेत.