पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:47 IST2025-11-02T17:46:38+5:302025-11-02T17:47:22+5:30
यासंदर्भात, अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने, कृतज्ञता व्यक्त केली असून, भारताने पाठवलेली ही मदत देशाचे आरोग्य क्षेत्र चांगले करण्यासाठी आणि रोग नियंत्रणाच्या कार्यात महत्वाची ठरेल, असे म्हटले आहे.

पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
अफगाणिस्तानला पुन्हा एकदा कठीण परिस्थितीत भारताने मोठी मदत केली आहे. भारताकडून काबूलला 16 टन औषधे आणि डायग्नोस्टिक किट पाठवण्यात आल्या आहेत. ज्या अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. मलेरिया, डेंग्यू आणि लीशमॅनियासिससारख्या संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. यासंदर्भात, अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने, कृतज्ञता व्यक्त केली असून, भारताने पाठवलेली ही मदत देशाचे आरोग्य क्षेत्र चांगले करण्यासाठी आणि रोग नियंत्रणाच्या कार्यात महत्वाची ठरेल, असे म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असताना आणि पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात हल्ले केले जात असताना आणि निर्वासितांना बाहेर काढण्याची कारवाई सुरू असतानाच भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी ही मदत पाठवली आहे. यामुळे असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचे अफगाण धोरन संकटात येऊ शकते.
भारताने या खेपेत मलेरिया आणि इतर संसर्गजन्य रोगांवरील औषधे, निदान किट्स आणि आरोग्य पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे. ही मदत चाबहार बंदराच्या माध्यमातून काबूलपर्यंत पोहोचवण्यात आली. चाबहार बंदर भारत-अफगाण व्यापार आणि सहकार्याचे महत्त्वाचा मार्ग बनत आहे.
यापूर्वीही भारताने भूकंपावेळीही, अफगाणिस्तानला मदत पाठवली होती. भारताने यापूर्वी काबूलला पाठवलेल्या मदतीत, औषधी, खाद्य सामग्री, वॉटर प्यूरीफायर, प्रोटीन पावडर, चादरी, स्लिपिंग बॅग, स्वच्छता किट, पाण्याची साठवण करण्यासाठी टाक्या, जनरेटर सेट आणि टेंट पाठवले होते. भारताने सप्टेंबर महिन्यात हवाईमार्गे 21 टन आपत्कालीन मदत पाठवली होती. यात, टेंट, चादरी, निदान किट्स आणि जनरेटरचा समावेश होता.