पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 03:49 IST2025-05-15T03:45:11+5:302025-05-15T03:49:54+5:30
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते.

पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
अमृतसर : भारत आणि पाकिस्तानने बुधवारी क्रमश: सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तान रेंजर्सकडून बंधक बनवण्यात आलेल्या प्रत्येकी एका जवानाला दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर एकमेकांच्या ताब्यात दिले.
बीएसएफचे जवान पूर्णम कुमार शॉ यांना पाकने पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर भारताच्या ताब्यात दिले. त्यांना पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते.
मुलाची गळाभेट घ्यायची आहे... : शाॅ यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. ते पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रिशडा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, आता मुलाची कधी एकदा गळाभेट घेतो, असे झालेय.