India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 01:42 PM2022-11-11T13:42:47+5:302022-11-11T13:44:47+5:30

ड्रोनबद्दल समजताच पोलीस दल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

Pakistan drone activity spotted in Indian LOC in Jammu Kashmir Police launch search operation | India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

Next

India Pakistan, LOC: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बरेच तणावपूर्ण आहेत. असे असताना दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थास्पित करण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत असे बोलले जाते. पण पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती अजूनही थांबलेल्या दिसत नाही. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआमध्ये स्थानिकांनी ड्रोनची हालचाल पाहिली. हे ड्रोन पाकिस्तानकडून पाठवण्यात आले होते. हिरानगरच्या बानाडी गावात ही ड्रोन अ‍ॅक्टिव्हिटी (Drone Activity) पाहायला मिळाली आहे. स्थानिक लोकांनी हे पाकिस्तानी ड्रोन पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही माहिती मिळताच तात्काळ कारवाई केली आणि ड्रोनची शोध मोहीम सुरू केली. पहाटे हा ड्रोन पाहिल्याचे गावातील लोकांनी सांगितले. त्यामुळे सध्या, याबद्दल अधिक माहिती मिळवणे सुरू आहे.

पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून ड्रोनच्या हालचाली सातत्याने होत आहेत. या ड्रोनचा वापर अनेक दहशतवादी संघटना आणि सीमेपलीकडील गुप्तचर यंत्रणा ड्रग्ज आणि शस्त्रे पुरवण्यासाठी करतात. अलीकडेच खोऱ्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्याच्या हलचाली होत असल्याची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर पंजाबमध्येही ड्रोनचा वापर ड्रग्जच्या व्यवसायासाठी होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खोऱ्यातील लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.

मुंबईमध्ये घेतली जातेय खास खबरदारी

दहशतवादी कारवायांसाठी या वस्तूंचा वापर केला जात असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर, या गोष्टींची उलब्धतता कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, खासगी हेलिकॉप्टर आणि हॉट एअर बलून फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर पोलिसांकडून हवाई निगराणी किंवा पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) यांच्या लेखी विशेष परवानगीशिवाय वरील कोणत्याही खासगी उड्डाणाच्या वस्तूंच्या हालचालींना परवानगी दिली जाणार नाही.

Web Title: Pakistan drone activity spotted in Indian LOC in Jammu Kashmir Police launch search operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.