Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 08:38 IST2025-05-07T08:36:14+5:302025-05-07T08:38:29+5:30
Operation Sindoor: भारतानं दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. तिन्ही दलांनी मिळून केलेल्या या संयुक्त कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं.

Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
Operation Sindoor: भारतानं दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. तिन्ही दलांनी मिळून केलेल्या या संयुक्त कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केलं. दरम्यान, यानंतर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीनं प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोठी आणि सैन्य दलाचे आभार मानले.
"माझ्या पतीच्या मृत्यूचा त्यांनी बदला घेतला यासाठी मी मोदींना धन्यवाद करते," अशी प्रतिक्रिया शुभम द्विवेदी यांच्या पत्नीनं दिली. "मी फक्त त्यांना धन्यवाद करेन. काहीही बोलण्यासाठी किंवा न बोलण्यासाठी मी फार लहान आहे. आमच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर विश्वास होता, त्यांनी त्याच प्रकारे प्रत्युत्तर देत आमचा विश्वास कायम ठेवला. ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे" असंही त्या म्हणाल्या.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचंही विधान समोर आलंय. पाक सैन्यानं सांगितलं की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत.
या ९ ठिकाणांवर हल्ले...
भारतीय सैन्य दलानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये या ९ ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
१. बहावलपूर,
२. मुरीदके,
३. गुलपुर,
४. भीमबर,
५. चकअमरू
६. बाग,
७. कोटली,
८. सियालकोट
९. मुजफ्फराबाद