लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:44 IST2025-12-15T18:43:49+5:302025-12-15T18:44:05+5:30

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ला प्रकरणात NIA ने 8 महिन्यांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

Pahalgam Terror Attack: NIA files chargesheet in Pahalgam attack case after 8 months, what revelations were made? | लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा

Pahalgam Terror Attack Chargesheet: राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आज(15 डिसेंबर 2025) रोजी जम्मू येथील विशेष NIA न्यायालयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह साजिद जट्ट उर्फ साजिद जट्ट याला या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे. NIAने साजिद जट्टवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आठ महिन्यानंतर NIA ने चार्जशीट दाखल केले. यात हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची, तसेच त्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. चार्जशीटनंतर आता न्यायालयीन प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता असून, पहलगाम हल्ल्यातील कटकारस्थाने, दहशतवादी नेटवर्क आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोण आहे साजिद जट्ट?

चार्जशीटनुसार, सैफुल्लाह साजिद जट्ट हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याचे मूळ गाव कसूर जिल्हा, पंजाब (पाकिस्तान) अशून, तो लष्कर-ए-तोयबामधील हाफिज सईदनंतर तिसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. साजिद हा लष्करचा प्रॉक्सी संघटना द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) चा प्रमुख आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवाया TRFद्वारे राबवण्यात आल्या असून, पहलगाम हल्लाही TRFनेच केला होता. केंद्र सरकारने 2023 मध्ये TRFवर UAPA अंतर्गत बंदी घातली आहे.

ऑपरेशन ‘महादेव’मध्ये तीन दहशतवादी ठार

NIAने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेले तीन दहशतवादी सुलेमान शाह, हमजा आणि जिब्रान यांना लष्कराने जुलै महिन्यात राबवलेल्या ऑपरेशन महादेव अंतर्गत ठार केले होते. हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

स्थानिक मदतनीसांचाही चार्जशीटमध्ये समावेश

NIAने आतापर्यंत 1,000 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये पर्यटक, टट्टू चालक, फोटोग्राफर, दुकानदार आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. दरम्यान, हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत, आश्रय आणि अन्न पुरवणाऱ्या तीन ओव्हरग्राउंड वर्कर्सची नावेही चार्जशीटमध्ये आहेत. त्यामध्ये बशीर अहमद जोथर, परवेज अहमद जोथर आणि मोहम्मद युसूफ कटारी यांचा समावेश आहे. याशिवाय TRF (द रेसिस्टंट फ्रंट) आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची नावेही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

22 एप्रिल 2025 चा भीषण हल्ला

22 एप्रिल 2025 रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैजसन घाटी येथे अंदाधुंद गोळीबार करत 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. ही घाटी एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, त्या वेळी अनेक पर्यटक सुट्टीसाठी आले होते. हल्लेखोरांनी आधी पर्यटकांचा धर्म विचारला आणि त्यांनी हिंदू असल्याचे सांगताच त्यांना गोळ्या घातल्या. दहशतवादी एम-4 कार्बाइन आणि AK-47 रायफल्सने सज्ज होते. या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला TRF ने स्वीकारली होती, मात्र नंतर या संघटनेने माघार घेतली होती. TRF हा लष्कर-ए-तोयबाचाच एक गट आहे.

NIAकडे तपास, अटक आणि कारवाई

या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी केंद्र सरकारने NIAकडे सोपवली होती. जून महिन्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये ऑपरेशन महादेव राबवून हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परवेज अहमद आणि पहलगामचा बशीर जोथर यांना NIAने अटक केली होती. या आरोपींनी दहशतवादी पाकिस्तानी असल्याची ओळख पटवली होती.

ऑपरेशन ‘सिंदूर’द्वारे भारताचा निर्णायक प्रत्युत्तर

पहलगाम हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठोस उत्तर दिले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून नष्ट केले. या मोहिमेत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या मुख्यालयांसह एकूण 9 दहशतवादी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती. तसेच पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसलाही मोठे नुकसान झाले होते.

Web Title : लश्कर-ए-तैयबा कमांडर साजिद जट्ट ने रचा पहलगाम हमले का षडयंत्र: एनआईए का खुलासा

Web Summary : एनआईए ने लश्कर-ए-तैयबा के कमांडर साजिद जट्ट को पहलगाम आतंकी हमले का मास्टरमाइंड बताया। 'महादेव' ऑपरेशन में तीन आतंकवादी मारे गए। स्थानीय समर्थन का खुलासा; 'सिंदूर' ऑपरेशन से आतंकी ठिकानों पर हमला कर बदला लिया।

Web Title : Lashkar-e-Taiba Commander Sajid Jatt Masterminded Pahalgam Attack: NIA Reveals

Web Summary : NIA chargesheets Sajid Jatt, Lashkar-e-Taiba commander, as mastermind of Pahalgam terror attack. Operation 'Mahadev' killed three terrorists involved. Investigation reveals local support; Operation 'Sindoor' retaliated with strikes on terrorist camps.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.