Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 10:51 IST2025-05-05T10:50:23+5:302025-05-05T10:51:30+5:30
Pahalgam Attack News: जम्मू आणि काश्मिरातील तुरुंगांवर हल्ला होण्याचा सावधगिरीचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही केंद्रशासित प्रदेशातील तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
Terror Attack Udpates: काश्मिरमधील श्रीनगर केंद्रीय तुरुंग आणि जम्मूतील कोट बलवाल तुरुंगांवरदहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर या तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या तुरुंगामध्ये अनेक मोठे दहशतवादी बंद आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीनगर केंद्रीय तुरुंग आणि जम्मूतील कोट बलवाल या तुरुंगांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केली जाण्याची शक्यता आहे. या तुरुंगांमध्ये काही मोठे दहशतवादी आहेत आणि ओजीडब्ल्यू (ओव्हर ग्राऊंड वर्कर्स म्हणजेच दहशतवाद्यांना मदत करणारे लोक) बंद आहेत.
वाचा >>VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली
गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आल्यानंतर सीआयएसएफचे महासंचालकांनी श्रीनगरमधील उच्चपदस्थ अधिकऱ्यांची भेट घेतली आणि आढावा घेतला. त्यानंतर तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली.
२०२३ पासून जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगांची सुरक्षा सीआयएसएफकडे देण्यात आली आहे.
पहलगामनंतर सुरक्षेत वाढ
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या होत्या. यात २६ पर्यटक मारले गेले होते, तर १७ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर दहशतवाद्यांनी थेट नागरिकांना लक्ष्य केले. त्यामुळे देशभरात जनक्षोभ उसळला.
या घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांचा आढावाही घेतला जात आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याने सध्या भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधही ताणले गेले आहेत.