Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:44 IST2025-06-23T05:43:48+5:302025-06-23T05:44:24+5:30
Pahalgam Attack Latest News: या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
- सुरेश एस डुग्गर, जम्मू
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून एनआयएने दोन जणांना अटक केली आहे. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते.
बटकोटमधील परवेज अहमद जोथर व पहलगाममधील हिल पार्कचा बशीर अहमद जोथर अशी त्यांची नावे आहेत.
या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
परवेज आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कजवळील एका तात्पुरत्या झोपडीत तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि अन्न, निवाऱ्यासह इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या.